अशोक चव्हाणांच्या घोषणेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार ?

अशोक चव्हाणांच्या घोषणेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील संघर्ष पेटणार ?

पुणे – काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर याठिकाणी पोहचली आहे. यावेळी बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांनाच इंदापुरातून उमेदवारी दिली जाणार असल्याची घोषणा केली आहे. शंकरराव पाटील आणि शंकरराव चव्हाण यांचे नाते आपल्या सर्वांना माहित आहे. तुमच्या मनात आहे ते आमच्याही मनात आहे. आघाडीची चर्चा होईल तेव्हा मी स्वतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलणार असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान इंदापूरच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात संर्ष पेटण्यार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आमनेसामने आले होते. काही दिवसांपूर्वीच काहीही झाले तरी इंदापूरची जागा कोणाला सोडणार नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी केलं होतं. त्यामुळे या जागेवरुन आता काँग्रेस –राष्ट्रवादीमध्ये जुंपणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS