निवडणुका तोंडावर आल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ‘या’ जागांवर तिढा कायम!

निवडणुका तोंडावर आल्या तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील ‘या’ जागांवर तिढा कायम!

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांच्या घोषणेचा धडाका लावला आहे. परंतु आघाडीची घोषणा करुन अनेक दिवस झाले असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नसल्याचं दिसत आहे. राज्यातील काही जांगांच्या आदलाबदलीवरुन दोन्ही पक्षात अजून चर्चा सुरु आहे. त्यामुळे हा तिढा कधी सुटणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे.

आघाडीतील ‘या’ जागांवर तिढा

औरंगाबादच्या जागेबाबत आघाडीत अद्याप निर्णय झाला नसून या जागेवर राष्ट्रवादीनं दावा केला आहे.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जागेबाबतही अद्याप संभ्रम असून रत्नागिरी- सिंधुदुर्गच्या बदल्यात रावेरची जागा काँग्रेसला जाऊ शकते. मात्र याबाबत अद्याप चर्चा नाही.

तसेच स्वाभिमानी संघटनेला सांगलीची जागा सोडण्याची शक्‍यता आहे. परंतु याबाबतही अद्यापपर्यंत निर्णय नाही.

माढासाठी संजयमामा शिंदे आणि दीपक आबा साळुंखे यांची नावे चर्चेत आहेत.

नगरसाठी अरुणकाका जगताप किंवा त्यांचे पुत्र संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत आहे.

जालना मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्‍चित नाही. त्यामुळे याठिकाणी कोणाला उमेदवारी देणार याकडे लक्ष लागलं आहे.

चंद्रपुरात बाळू धानोरकर यांना स्थानिक कॉंग्रेस नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे याठिकाणीही उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघात तर काँग्रेसला उमेदवार मिळणेही मुश्‍कील

हिंगोलीत कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न काँग्रेससमोर आहे.

पुणे मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नाही. संजय काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत. मात्र, त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

अकोला, शिर्डी, पालघर या मतदारसंघांत काँग्रेसकडे उमेदवारच नाही त्यामुळे याठिकाणी उमेदवार देण काँग्रेसपुढे मोठे आव्हान आहे.

COMMENTS