काँग्रेस आमदारासह राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेस आमदारासह राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असून इगतपुरी मतदारसंघाच्या आमदार निर्मला गावित आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे पक्षनेतृत्व कामाची कदर करत नसल्याने पक्ष सोडणार असल्याचे रश्मी यांनी यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला बागल यांच्या रुपाने मोठा धक्का बसला आहे.

निर्मला गावित यांची प्रतिक्रिया

दरम्यान निर्मला गावित यांनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर मतदारसंघातून सलग दोन वेळेस त्या निवडून आल्या असून तिसय्रा वेळेस त्या शिवसेनेतून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.
गांधी घराण्याशी आम्ही एकनिष्ठ होतो. जिल्ह्यातील राजकारणामुळे वडील नाराज होते. पक्षाने भावासाठी लोकसभेचं तिकीट नाकारलं होत. माझा निर्णय माझ्या मतदारसंघासाठी आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी शिवसेनेत जाण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. काँग्रेसबद्दल कोणतीही नाराजी नाही. भावाने कोणत्या पक्षात जावं हा सर्वस्वी त्याचा निर्णय आहे. त्याला विधानसभेला तिकीट अपेक्षित होतं, पण शब्द मिळाला नाही. माझे वडील आहे तिथेच आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे, त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला असल्याचं गावीत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS