काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, ‘या’ जागांमध्ये अदलाबदली ?

काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, ‘या’ जागांमध्ये अदलाबदली ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशातच काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीने एका जागेची अदलाबदली केली आहे. रावेरच्या बदल्यात राष्ट्रवादीला पुण्याची जागा सुटण्याची शक्यता असून रावेर मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडला आहे. रावेरची जागा घेऊन औरंगाबाद किंवा पुण्याची जागा देण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने महिनाभरापूर्वीच काँग्रेसला दिला होता त्यावर आज अखेर शिक्कामोर्तब झालं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान पुण्याची जागा सोडण्यास काँग्रेस तयार नव्हते
परंतु आता राष्ट्रवादीने रावेरची जागा सोडल्याने काँग्रेस पुण्याची जागा सोडण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही, त्यामुळे ही जागा सोडण्याबाबत काँग्रेसमध्येही अनुकूलता असल्याची चर्चा असून याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS