आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे!

आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना स्वतंत्र कृषी बजेट, संपूर्ण कर्जमाफी, बेरोजगार तरुणांना 5 हजार रुपये बेरोजगारी भत्ता, आशा वर्करला कायम सेवेत सामावून घेणार, सर्व विना अनुदानित शाळा अनुदानित करणार, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा रुग्णालय अधिक आधुनिक बनवणार, अशी आश्वासने देण्यात आली आहेत. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेते उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी 100% अनुदान देणार

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव

जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार

विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी

सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता

स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ

सर्व महापालिका हद्दीतील 500 चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी

निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणार

शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण

उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज

राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा

कामगारांना किमान 21 हजार वेतन

COMMENTS