लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक !

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक !

मुंबई – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्यात येणार असून ही बैठक काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी सुरु झाली आहे.

दरम्यान या बैठकीत दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत. २००९ च्या निवडणुकीतील जागा वाटप कायम रहावे ही काँग्रेसची भूमिका, तर जागा वाढवून घेण्यासाठी राष्ट्रवादी आग्रहीअसून 50 टक्के जागांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती आहे. तसेच 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले होते. तर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 169 तर राष्ट्रवादीने 119 जागा लढवल्या होत्या. तसेच लोकसभेच्या 26 जागा काँग्रेसने तर 22 जागा राष्ट्रवादीने लढवल्या होत्या. त्यामुळे आगामी निवडणुकीत 50 टक्के जागा काँग्रेस सोडणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS