मुंबई महापालिकेत कचरा शुल्कावरुन राजकारण तापलं, भाजप, काँग्रेसची एकच भूमिका !

मुंबई महापालिकेत कचरा शुल्कावरुन राजकारण तापलं, भाजप, काँग्रेसची एकच भूमिका !

मुंबई – मुंबई महापालिकेत कचरा शुल्कावरुन राजकारण पेटलं असल्याचं दिसत आहे.महापालिकेतील हौसिंग सोसायट्या, व्यावसायिक संस्था, मॉल आणि बाजारपेठांमध्ये निर्माण होणारा कचरा उचलण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार महापालिका करत आहे. परंतु याबाबत महापालिकेला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे.

दरम्यान स्थायी समितीमध्ये विरोधकांनी विरोध केला असून याबाबत पालिका अधिकाऱ्यांनी स्वतः निर्णय घेवू नयेत. तसेच स्थायी समितीला अंधारात का ठेवलं जातं आहे ? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तसेच कचरा उचलण्यावर शुल्क लागू देणार नसल्याची भूमिका भाजप आणि काँग्रेसनं घेतली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सध्या कचरा उचलण्याच्या शुल्कावर राजकारण तापलं असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS