राहुल गांधींना पप्पू म्हणणं काँग्रेस नेत्याला पडलं महागात !

राहुल गांधींना पप्पू म्हणणं काँग्रेस नेत्याला पडलं महागात !

जयपूर- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पप्पू म्हणणं एका काँग्रेस नेत्याला चांगलच महागात पडलं आहे. राजस्थानमधील युथ काँग्रेसचे महासचिव ब्रम्हप्रकाश बिश्नोई यांनी राहुल गांधींना त्यांच्या व्हॉट्अॅपवर पप्पू म्हटलं आहे. केशव चंद्र यादव यांना राजस्थानच्या युथ काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे ते नाराज होते. त्यावरुनच त्यांनी राहुल गांधी यांना पप्पू का म्हणतात? हे आता समजलं असल्याचा मेसेज वॉट्सअप ग्रुपमध्ये केला. बिश्नोई यांचा हा मेसेज लगेच व्हायरल झाला. त्यानंतर पक्षाकडून कारवाई करत बिश्नोई यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे.

दरम्यान बिश्नोई यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा अपमान केला असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द केलं असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. बिश्नोई हे काँग्रेसचे नेते अशोक चांदना यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येते. चांदना यांना अध्यक्षपदाची संधी न दिल्याने ते खूप नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राहुल गांधींना पप्पू म्हटलं असून त्यांना हे आता महागात पडलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केशवचंद्र यादव यांना युथ काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलं होतं. राज्यात युथ काँग्रेसला मजबुत करण्यासाठी राहुल गांधी यांनी यादव यांची निवड केली होती. राहुल गांधी यांनी हा निर्णय पक्षातील तरुणांना जोडण्यासाठी व व्होटबँक मजबूत करण्यासाठी घेतला होता. परंतु बिस्नोई यांना हा निर्णय आवडला नसल्यामुळेच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

COMMENTS