देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच – राहुल गांधी

देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच – राहुल गांधी

मुंबई – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद फक्त काँग्रेसमध्येच असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते काँग्रेसच्या ८४ व्या महाअधिवेशनात बोलत होते. महाअधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून आजच्या दिवशी राहुल गांधी यांच्या भाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली. सध्या समाजात तेढ निर्माण केले जात आहे. देशाला जोडण्याची ताकद तरुणांमध्ये असून काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही, असंही राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखील पहिल्यांदाच हे महाअधिवेशन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर सरकारच्या फसव्या योजना, बेरोजगारी, औद्योगिक पिछेहाट, जातीय दंगे आणि लोकशाही कशी धोक्यात आहे, या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच या अधिवेशनात महत्त्वाचे प्रस्ताव संमत केले जाणार आहेत.

अधिवेशनात संमत होणारे प्रस्ताव

१. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर प्रस्ताव
२. देशाच्या आर्थिक परिस्थिती वर प्रस्ताव
३. परराष्ट्र धोरणा संदर्भात प्रस्ताव
४. शेतक-यांची अवस्था आणि कृषी क्षेत्राच्या परिस्थितीवर प्रस्ताव
५. रोजगार संदर्भातचा प्रस्ताव
६. गरीबी निर्मुलन संदर्भात प्रस्ताव

COMMENTS