राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट !

राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शरद पवारांची त्यांच्या  पेडररोड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीचं कारण मात्र सध्या गुलदस्त्यात असून पुण्यामध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीनंतर शरद पवारांची भेट झाली नसल्यामुळे आपण त्यांना भेटायला आलो असल्याचं राज यांनी म्हटलं आहे. परंतु राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटीमुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मागच्या महिन्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. परंतु शरद पवारांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसून ही फक्त सदिच्छा भेट होती असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS