आघाडी नाही झाली तरीही काँग्रेस ‘या’ ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना देणार पाठिंबा?

आघाडी नाही झाली तरीही काँग्रेस ‘या’ ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना देणार पाठिंबा?

नागपूर – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधातील महाआघाडीत भारिप बहुजन महासंघाते नेते प्रकाश आंबेडकर यांना सामील करुन घेण्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांना सामीलघेण्याची काँग्रेसची इच्छा आहे. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमशी युती केली आहे. एमआयएमची साथ सोडून काँग्रेससोबत जाण्यास ते तयार नाहीत आणि एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सामील होतात ती नाही. हे माहीत नाही परंतु प्रकाश आंबेडकरांसोबत आघाडी झाली नाही तरीही राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करण्यासाठी काँग्रेस अकोल्यामध्ये त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आंबेडकरांना पाठिंबा देऊन त्याबदल्यात राज्यातील मतांचा पाठिंबा मिळू शकतो अशी काँग्रेसला आशा आहे.
त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोला मतदारसंघात पाठिंबा द्यायचा आणि त्याबदल्यात राज्यातील आंबेडकरवादी मतं आकर्षित करायची असा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे याबाबत प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेणार याकडे लक्षलागलं आहे.

COMMENTS