कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन, 9 वर्षांपासून होते कोमात

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन, 9 वर्षांपासून होते कोमात

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे सोमवारी निधन झाले. यूपीए 1 सरकारमध्ये ते मंत्री होते. ते 9 वर्षांपासून कोमात होते. त्यांचे वय 72 वर्षे होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी दीपा दासमुन्शी आणि मुलगा प्रियदीप आहेत. 2008 मध्ये त्यांना स्ट्रोक आणि पॅरालिसिस झाला. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते.

2008मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर ते कोमात गेले. तेव्हापासून ते कोणाल ओळखत नव्हते तसेच, बोलतही नव्हते. त्यांना दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ मेलिकड सायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कालावधीनंतर पुढील उपचारासाठी त्यांना अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले.

प्रियरंजन दासमुन्शी यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1945मध्ये झाला. दक्षिण कोलकाता मतदार संघातून 1971मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात 1985मध्ये त्यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. 2004 मध्ये बंगालच्या रायगंज मतदारसंघातून लोकसभेत ते अखेरचे निवडून गेले होते.

 

 

COMMENTS