राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?

राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली – सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत गेली 3 वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळणारे राहुल गांधी यांनाच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. आज झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत असा प्रस्तावच मंजूर करण्यात आला. मात्र, पक्षाच्या घटनेनुसार लोकशाही पद्धतीनं अध्यक्ष ठरविण्यासाठी निवडणुकीची घोषणाही करण्यात आली. त्यानुसार, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी 16 डिसेंबरला मतदान होणार असून 19 डिसेंबर रोजी अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे.

राहुल गांधी सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असून, अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताच जास्त आहे. याआधीही राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांकडून होत आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 5 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 16 डिसेंबरला गरज पडल्यास मतदान घेण्यात येईल. पण सध्या तरी या स्पर्धेत राहुल गांधी एकमेव आहेत.

COMMENTS