मुंबई – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडीत हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसची काल मध्यरात्री एक वाजेपर्यंत विधानपरिषद उमेदवारांबाबत खलबतं झाली. या बैठकीत खालील नावांवर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रजनी पाटील किंवा मोहन जोशी किंवा सत्यजित तांबे, माणिक जगताप किंवा मुझफर हुसेन, सचिन सावंत किंवा नसीम खान आणि नगमा किंवा अनिरुद्ध वायकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. यातील नावं अंतिम होऊन मंत्री मंडळाच्या बैठकीआधी दिल्लीतून बाळासाहेब थोरात यांना कळवण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
दरम्यान तिन्ही पक्षांकडून 12 आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. या यादीत नव्यानेच राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांचं देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी तयार आहे.
राष्ट्रवादी
दरम्यान राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले शिवाजी गर्जे, मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख आदिती नलावडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.
शिवसेना
शिवसेनेकडून सुनील शिंदे, शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जाणारे सचिन अहिर, युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई, युवासेना पदाधिकारी, राहुल कनाल, सूरज चव्हाण आणि सलग तीन वेळा शिरुरचे खासदार राहीलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांचंही नाव या यादीत असल्याची माहिती आहे.
मराठा आरक्षणासाठी या तरुणांचं एक पाऊल पुढे, तुळजापूर ते मंत्रालय केला पायी प्रवास! https://t.co/lqsG7Xk1o4 pic.twitter.com/t88VUxxQzd
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 28, 2020
जान कुमार सानूवर कारवाई होणार का? गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया ! पाहा https://t.co/JpkoAvixM9@MNSAmeyaKhopkar pic.twitter.com/bJsvdV5WgG
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 29, 2020
खडसेनंतर टार्गेट पंकजा मुंडे, खांदा सुरेश धस यांचा मात्र बंदूक कोणाची ?https://t.co/SaPgg8rf2B pic.twitter.com/ZJIcM1nQq7
— Mahapolitics (@Mahapoliticsnew) October 28, 2020
COMMENTS