कोल्हापूर – आगामी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे.कोल्हापुरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डी. वाय. पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले आहे. त्यामुळे डी. लाय. पाटील यांच्या रुपाने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
डी. वाय.पाटील यांची राजकीय कारकिर्द
1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.
2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहारचे राज्यपालही होते.
त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही कार्यभार काही काळासाठी होता.
1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते.
दरम्यान डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकीय विरोधक मानले जाणारे धनंजय महाडिक हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. तर, सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. परिणामी सतेज पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
COMMENTS