उदयनराजे भोसलेंनी केलं भाजप सरकारचं कौतुक!

उदयनराजे भोसलेंनी केलं भाजप सरकारचं कौतुक!

सातारा – खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचं कौतुक केलं आहे. खंबाटकी घाटात नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या 3 मार्गिका जुळे बोगद्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी उदयनराजेंनी सरकारचं कौतुक केलं आहे. सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून ते कार्यक्षम असल्याचं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. तसेच आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा आहे.
सातारकरांचे स्वप्न पूर्ण झालं. बाकीचे फक्त बोलले; पण नितीन गडकरी यांनी करून दाखवले असं म्हणत खासदार उदयनराजे यांनी य केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली.

दरम्यान सध्याच्या शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेला निर्णय स्तुत्य असून सरकारकडे कान करण्याची क्षमता आहे. सरकारने केलेल्या कामाची जनता पोहच पावती देईल असही यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं आहे.
उदयनराजेंच्या या कौतुकाला मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या भाषणात उत्तर दिलं. छत्रपतींच्या शुभेच्छा सोबत आहेत आणि त्या यापुढेही कायम राहतील असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं.

COMMENTS