कोपर्डी प्रकरणातील तीनही दोषींना फाशीची शिक्षा

कोपर्डी प्रकरणातील तीनही दोषींना फाशीची शिक्षा

कोपर्डी ‘निर्भया’कांड प्रकरणातील आरोपींना आज जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पप्पू ऊर्फ जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ, नितीन भैलुमे, या तिघांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने दोषी ठरविले होते. आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर शारीरिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी जितेंद्र, संतोष, नितीन या तिघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरविले होते. खटल्यात आरोपींच्या शिक्षेवरील युक्तिवादही पूर्ण झाला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली होती. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींनी केलेला गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ असून, कट रचून नियोजनबद्धरित्या हा खून केलेला असल्याने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली होती.

कोपर्डी ‘निर्भया’कांडाचा खटला संवेदनशील असल्याने पोलिस प्रशासनाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

COMMENTS