कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय!

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असून, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आवश्यक खबरदारी आणि पावलं उचलत आहे. गर्दी टाळण्यासाठी काटेकोर प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद कराव्यात, असे निर्देश देतानाच, ग्रामपंचायत व नगरपालिकेच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुढील सात दिवस सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान अनेक सर्वसामान्य नागरिक कामानिमित्ताने सरकारी कार्यालयात जात असतात. त्यामुळे सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारने केलं आहे.

दरम्यान कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे, बस आणि मेट्रो सेवाही 7 दिवस बंद ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS