पिंपरी – आळंदीमध्ये आज खळबळजनक घटना घडली असून भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करुन त्यांची हत्या केली आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून हल्ल्याचं कारण मात्र अजून अस्पष्ट आहे. या घटनेमुळे आळंदीतील राजकीय वातावरण सध्या तापलं असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान वडमुखवाडी येथे बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत हल्ला केला आहे. बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक आहेत. ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांचा बांधकाम हा व्यवसाय होता. पिंपरी चिंचवडमध्ये एका आर्किटेक्टकडे बालाजी कांबळे आले होते. पुढे ते पुण्याला गेल्याचं बोललं जातंय, तिथून परतत असताना हा हल्ला झाल्याची माहिती असून याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS