तिकीट मिळवण्यासाठी अरविंद केजरीवालांना सहा कोटी  दिले, आप उमेदवाराच्या मुलाचा आरोप !

तिकीट मिळवण्यासाठी अरविंद केजरीवालांना सहा कोटी दिले, आप उमेदवाराच्या मुलाचा आरोप !

नवी दिल्ली – लोकभेचे आपचे उमेदवार बलबीर सिंह जाखड यांच्या मुलाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. माझे वडील बलबीर सिंह जाखड यांनी तिकिट मिळवण्यासाठी अरविंद केजरीवालांना सहा कोटी रूपये मोजले असल्याचं उदय सिंह जाखड याने म्हटलं आहे. माझ्या वडिलांनी स्वतः मला ही बाब सांगितली. माझ्या वडिलांनी तीन महिन्यांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. माझे वडील कधीच आप या पक्षात नव्हते आणि त्यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातही सहभाग घेतला नव्हता असंही उदय सिंह जाखडने म्हटलं आहे. उदय सिंहच्या या आरोपामुळे दिल्सीत खळबळ उडाली आहे.

दरम्यान राजकारणाची काहीही पार्श्वभूमी नसताना माझ्या वडिलांना तिकिट कसं मिळालं. मी त्यांना शिक्षणासाठी पैसे मागितले तर त्यांनी मला मनाई केली.
त्यामुळे केजरीवाल यांनी सहा कोटी त्यांना तिकीट दिलं अलयसल्याचं उदय सिंहने म्हटलं आहे. दरम्यान या आरोपानंतर बलबीर सिंह जाखड यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या मुलाने केलेले आरोप बिनबुडाचे आणि चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर मी माझ्या मुलाशी या विषयावर बोललोच नाही, त्याचे आणि माझे बोलणेही फार कमी प्रमाणात होते असंही जाखड यांनी सांगितलं.

COMMENTS