मुंबई – गुंतवणूकदारांच्या ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले डीएस कुलकर्णी यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी डी एस कुलकर्णी यांनी भेट घेतली असून त्यांच्या भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यापूर्वीही डीएसकेंनी विविध पक्षातील आमदारांची भेट घेतली आहे.
गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आपला हेतू दाखवण्यासाठी ५० कोटी रुपये न्यायालयात जमा करू, अशी ग्वाही वारंवार देऊनही त्याचे पालनच केले जात नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पुण्यातील बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांची अत्यंत कडक शब्दांत कानउघाडणी केली आहे. त्यानंतर डी एस कुरकर्णी यांनी आज धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
COMMENTS