राज्य हगणदारीमुक्तीची घोषणा म्हणज्ये दुरून डोंगर साजरे – सुप्रिया सुळे

राज्य हगणदारीमुक्तीची घोषणा म्हणज्ये दुरून डोंगर साजरे – सुप्रिया सुळे

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात सातत्याने हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असतात. ते गाडीतून क्वचितच फिरतात. त्यामुळे त्यांना जमिनीवरील वास्तवाची जाणीव नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली हगणदारीमुक्तीची घोषणा ही हवेतून केलेले निरीक्षण आहे. त्यामुळे हगणदारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा म्हणज्ये दुरून डोंगर साजरे करण्यासारखं आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. राज्य हगणदारीमुक्त करण्यासाठी आणखी खूप काम करण्याची गरज असल्याचंही सुळे म्हणाले.

वसुंधरा दिवसा निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातल्या तळजाई टेकडीवर नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर समाजमाध्यमातून आणि इतर माध्यमातून चांगलीच टीका होत आहे. गोवोगावी सकाळी दिसणा-या परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला नसताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आधारावर राज्य हगणदारीमुक्तीची घोषणा केली असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत.

COMMENTS