सरकारची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार – धनंजय मुंडे

सरकारची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार – धनंजय मुंडे

मुंबई – राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे चिंताग्रस्त असतांना त्यांना आधार देण्याऐवजी स्वतः ऊर्जामंत्री शेतकऱ्यांकडील विजेची थकबाकी सक्तीने वसूल करण्याच्या सूचना देत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारची ही कृती म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. याबाबत ट्वीट करुन त्यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

राज्यातील कृषी पंपधारक वीज ग्राहकांकडून वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. 25 हजार रुपयांपेक्षा कमी वीज बिल थकीत असल्यास 3 हजार रुपये तातडीने वसूल करण्याचे आदेश बावनकुळे यांनी दिले आहेत. तर 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असल्यास 5 हजार रुपये तातडीने वसूल करा असे आदेशही बावनकुळे यांनी दिले आहेत.राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ असताना वीज बील वसुलीचे आदेश निघाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उभं ठाकलं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

 

COMMENTS