खंजीर कुणाच्या पाठीत खुपसणार बदामरावांच्या की लक्ष्मण पवारच्या ? – धनंजय मुंडे

खंजीर कुणाच्या पाठीत खुपसणार बदामरावांच्या की लक्ष्मण पवारच्या ? – धनंजय मुंडे

गेवराई – गेवराई विधानसभेच्या उमेदवारीमध्ये आपण खंजीर कुणाच्या पाठीत खुपसणार आहात बदामरावांच्या की लक्ष्मण पवारांच्या ? याचा खुलासा अगोदर करा आणि मग आमच्या बद्दल बोला असे आवाहन विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी धोंडराईच्या सभेत केले. तर दादांवर गुन्हे दाखल करणार्‍यांनी आमच्या बद्दल सहानुभूती दाखवु नये असे प्रतिपादन अमरसिंह पंडित यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या धोंडराई येथील सभेत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,अमरसिंह पंडित यांनी पालकमंत्र्याच्या टिकेचा खरपुस समाचार घेतला. यावेळी हजारो मतदार आणि मित्रपक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षांच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 3 एप्रील रोजी धोंडराई येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,माजी आ. अमरसिंह पंडित, उमेदवार बजरंग सोनवणे,शेकापचे मोहन गुंड,अ‍ॅड.सुरेश हात्ते,दादासाहेब मुंडे,श्रीराम मुंडे,भरत खरात,भाऊसाहेब नाटकर,फुलचंद बोरकर यांच्यासह मान्यवर नेते व महाआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यासभेत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,अमरसिंह पंडित व बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या टिकेचा खरपुस समाचार घेतला.

यावेळी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, पाठीत खंजीर खुपसणार्‍यांची औलाद पंडितआण्णा मुंडेची नाही,खंजीर कुणाच्या पाठीत खुपसणार आहात बदामरावांच्या की लक्ष्मण पवारांच्या याचा खुलासा अगोदर तुम्ही करा. अमरसिंह पंडित आणि माझ्या मैत्रीबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही,स्वत:ला वाघीन समजुन गलोरीची उपमा बप्पांना देणार्‍यांना मला एकच सांगणे आहे,खर्‍या शिकार्‍याने गलोरीने नेम धरुन शिकार केल्यास तो वाघीनीची सुद्धा शिकार करु शकतो हे लक्षात घेतले पाहिजे केवळ तुम्ही श्रीमंताच्या पोटी जन्मलात म्हणुन तुम्ही वाघीन आणी बप्पा गरिब शेतकर्‍याच्या पोटी जन्मले म्हणुन ते गलोर असे कसे होवु शकते ? या निवडणुकीत बप्पांच्या रुपाने नेमधारी शिकारी वाघाीनीची शिकार करणार आहे. आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीचे दाखले देवुन कोणी-कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला असा सवाल जनतेला केला.

अमरसिंह पंडित यांच्या बद्दल बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, अमरसिंह पंडित यांनी विधान परिषदेमध्ये शेती,सिंचन आणि पाण्याचे प्रश्न मांडले. शास्वत शेती या विषयावर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. मागील अनेक वर्षापासुन त्यांची आणि माझी अतुट मैत्री असुन माझ्यावर त्यांनी लहान भावाप्रमाणे प्रेम केले आहे. विरोधकांनी कितीही अफवा पसरुन आमच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला जनता भिक घलणार नाही. विरोधकांच्या अफवांना उत्तर देण्यासाठी गेवराईच्या मतदारांनी बजरंग सोनवणे यांना विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. आपल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडुन टिका केली. ही निवडणुक हुकूमशाही विरुद्ध लोकशाही असल्याचेही त्यांनी सांगितले.

खा. शरद पवार साहेब यांनी बजरंग सोनवणेच्या रुपाने सर्वसामान्य शेतकरी पुत्राला न्याय दिला असुन सामान्यांचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले. तर विद्यमान खासदारांच्या अकार्यकक्षमते बाबत बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणात टिका केली. सभेला भाऊसाहेब नाटकर,दादासाहेब मुंडे,भरतदादा खरात,अ‍ॅड,सुरेश हात्ते,फुलचंद बोरकर,श्रीराम मुंडे,मोहनराव गुंड,जालिंदर पिसाळ,अशोक नरोटे,कुमारराव ढाकणे,जगन्नाथ शिंदे,पाटीलबा मस्के,जगन पाटील काळे,सुनिल पाटील,सुभाष मस्के,सुभाष महाराज नागरे, शाम मुळे,ऋषिकेश बेदरे,कु. मोनीका खरात,राजेंद्र डाके,सुभाष नागरे यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने मतदार उपस्थित होते.

COMMENTS