मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभेची निवडणूक परळी मतदारसंघातूनच लढवणार असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगितलं असल्याचंही मुंडे यांनी म्हलं आहे. मागील निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी विधानसभेची निवडणूक याच मतदारसंघातून लढवली होती. त्यावेळी धनंजय मुंडे याचा पंकजा मुंडे यांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीतही हे दोघं बहिण-भाऊ आमनेसामने असणार असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच्या दुरावलेल्या नात्यावर धनंजय मुंडे यांनी भावनिक मत व्यक्त केलं आहे. या नात्यातला दुरावा कमी करण्यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून कधीही दोन पावलं पुढे जाण्याची तयारी असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान दुरावा मिटवण्यासाठी दोन्ही बाजूने त्या पद्धतीचा संवाद लागतो. नात्यातला दुरावा मिटवण्यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून माझे दोन पावलं क्धीही पुढे असतील. तसा संवाद दोन्ही बाजून हवा. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि नातं दुस-या ठिकाणी असतं. त्यामुळे संवाद जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत नात्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत नसल्याचंही यावेळ धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS