नागपूर – शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी नागपूरमध्ये जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी या मोर्चादरम्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी सरकारला इशारा दिला आहे. राज्यातील जनतेकडे लक्ष द्या, शेतक-यांच्या मागण्या मान्य करा नाही तर ही जनता तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
या मोर्चादरम्यान बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले की मुख्यमंत्री महोदय, लक्षात ठेवा शेतकरी आणि जनता हिताचे निर्णय घ्या नाहीतर ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतले आहे तीच जनता पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाही असा इशारा मुंडे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री महोदय, लक्षात ठेवा शेतकरी आणि जनता हिताचे निर्णय घ्या नाहीतर ज्या जनतेने डोक्यावर घेतले आहे तीच जनता पायाखाली घेतल्या शिवाय राहणार नाही. #हल्लाबोल pic.twitter.com/dekzNiMzoi
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 12, 2017
COMMENTS