‘त्या’ व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज -धनंजय मुंडे

‘त्या’ व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज -धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणाय्रा नेत्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे. भाजपा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत आहे. त्या भाजपाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची गरज लागते. याचा अर्थ भाजपा सत्तेत असूनही पक्ष एवढा मजबूत नाही की ते स्वतःच्या ताकदीवर राज्यात सत्ता स्थापन करू शकतील अशी टीका मुंडे यांनी केली आहे.तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्याच्या वल्गना करत होते, ते आज भाजपा काँग्रेस आणि राष्ट्रवादी युक्त करत आहेत. दोन चार आमदार गेल्याने राष्ट्रवादीला काही फरक पडत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे.

राज्यातील पुरोगामी जनता भाजपाची स्वप्न धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. पक्षाने आत्मपरिक्षण करावं असं काहीच नाही. पिचड आमचे ज्येष्ठ नेते होते, पवारांनी त्यांना अनेक वर्ष राज्याची सेवा करण्याची संधी दिली. ज्याच्या रक्तात पुरोगामी विचार भिनलेला त्या पिचडांनी आज भाजपात प्रवेश करावा अशा व्यक्तींनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS