ईव्हीएम विरोधातील सर्वपक्षीय मोर्चाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा – राज ठाकरे

ईव्हीएम विरोधातील सर्वपक्षीय मोर्चाला ममता बॅनर्जींचा पाठिंबा – राज ठाकरे

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आज कोलकाता येथे भेट घेतली. ईव्हीएमच्या मुद्यावरून राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. तसेच, ईव्हीएमच्या मुद्यावर आपल्याला उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, व निवडणूक आयुक्तांकडून कोणतीच अपेक्षा नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आपण निवडणुकीत ईव्हीएम वापराच्या मुद्यावरून भेट घेण्यासाठी आलो होतो असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ममता दीदी या देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या राजकीय विरोधक समजल्या जातात. 9 ऑगस्टला मुंबईत ईव्हीएम विरोधात सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी दीदींना निमंत्रित केलं आहे. यापूर्वीही राज यांनी याच मुद्यावरून यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांची देखील दिल्लीत भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी या अगोदर केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे, त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केली असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या आंदोलनात आता ममता बॅनर्जीही सहभागी होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS