धनंजय मुंडेंचा ‘तो’ आत्मविश्वास खरा ठरणार ?

धनंजय मुंडेंचा ‘तो’ आत्मविश्वास खरा ठरणार ?

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रमेश कराड यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागे घेतली आहे.त्यामुळे धनंजय मुंडे यांना चांगलाच धक्का बसला आहे. परंतु खरा दे धक्का काय असतो ते 24 तारखेला म्हणजे विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी समजणार असल्याचा इशारा तमुंडे यांनी दिला आहे. त्यामुळे मुंडे यांनी व्यक्त केलेला हा आत्मविश्वास खरा ठरणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

दरम्यान लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार धक्का दिला असून भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले उमेदवार रमेश कराड यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीला हा जोरदार धक्का असल्याचं बोललं जात आहे. परंतु अशातच आता धनंजय मुंडे यांनी खरा धक्का 24 तारखेला म्हणजेच निकालाच्या दिवशीच समजेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादीच जिंकणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंडे यांचा हा विश्वास खरा ठरणार का हे 24 तारखेलाच समजणार आहे.

COMMENTS