भ्रष्टाचाराचे आरोप असताना ‘या’ नेत्यांना भाजपात घेतले -धनंजय मुंडे

भ्रष्टाचाराचे आरोप असताना ‘या’ नेत्यांना भाजपात घेतले -धनंजय मुंडे

पैठण – कोल्हापूर – सांगलीची पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ना सरकारी यंत्रणा सक्षम होती , न अधिकारी उपस्थित होते. म्हणून सरकारला पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच महापुराची आपत्ती टळल्यानंतर सरकारने जमावबंदी केली. इथे कोण दंगल घडवणार होते का ? त्यामुळे आता सरकारला गाडण्याची वेळ आली आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँगेसचे नेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला टोले मारले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निघालेली शिवस्वराज्य यात्रा आज पैठण येथे आली. यावेळी संत एकनाथांच्या भूमीत विरोधकांनी सत्ताधारी भाजप-सेना युतीला चांगलेचं खडे बोल सुनावले. धनंजय मुंडे यांनी कोल्हापूर सांगलीला आलेल्या महापुरावरून ढिसाळ प्रशासनाला वेठीस धरले. धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्र महापुराच्या विळख्यात सापडल्याने आम्ही यात्रा थांबवली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी पूरग्रस्त कुटुंबाना पुन्हा उभ राहण्यासाठी मदत केली. आणि अजूनही करत आहेत. मात्र हे ढिसाळ सरकार गाफील आहे. मुख्यमंत्री आणि युवराज यात्रांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे अशा सरकारला गाडण्याची वेळ आली आहे.

तसेच मुख्यमंत्री प्रचंड खोटारडेपणा करत आहेत. त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीडने जोडणार असे आश्वासन दिले होते. आजूनही ते काम झालेले नाही. आणि त्यामुळेच भीषण दुष्काळास सामोरे जाण्याची पाळी लोकांवर आली आहे. आघाडी सरकार असताना अजित दादा मराठवाड्यासाठी धावून यायचे, असे धनंजय मुंडे म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फोडण्याचे काम भाजप शिवसेना करत आहे. इतके नीच राजकारण कधी महाराष्ट्रात घडले नव्हते. भ्रष्टाचाराचे आरोप असताना बबनराव पाचपुते, विजय गावित यांना भाजपात घेतले गेले, अशी टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.

COMMENTS