मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. या विस्तारात एकूण 13 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप नेते आशिष शेलार यांचीही या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागली आहे. शेलार यांच्याकडे विनोद तावडे यांच्याकडील शिक्षणमंत्रीपद देण्यात आलं आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्विट केलं आहे.
तावडेंचा कारभार होता गोल गोल
शिक्षणांचा वाजवला होता ढोल ढोल
शेलार तरी सावरणार का तोल?
शेलार, तुमच्यावर भरोसा ठेवायचा का?
नवनिर्वाचित शिक्षणमंत्री @ShelarAshish यांचे अभिनंदन!
स्टेट बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देऊन केलेल्या अन्यायाला न्याय द्या. @TawdeVinod— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 17, 2019
दरम्यान या ट्वीटमध्ये मुंडे यांनी, तावडेंचा कारभार होता गोल गोल, शिक्षणाचा वाजवला होता ढोल ढोल, शेलार तरी सावरणार का तोल? शेलार, तुमच्यावर भरोसा ठेवायचा का? असा सवाल केला आहे. तसेच नवनिर्वाचित शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचेही मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच स्टेट बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देऊन केलेल्या अन्यायाला न्याय द्या अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.
COMMENTS