मंत्रिपदासाठी शिवसेना भाजपसमोर लाळ गाळतेय – धनंजय मुंडे

मंत्रिपदासाठी शिवसेना भाजपसमोर लाळ गाळतेय – धनंजय मुंडे

सातारा – शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नसल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान उंब्रज येथील सभेत धनंजय मुंडे यांनी ही टीका केली आहे.

 

 

दरम्यान मागच्या निवडणुकीत २०१४ च्या काळात देशभरातील तरुणाई दीड-दीड फुट उड्या मारत ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा घोषणा देत होती. त्यांना रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. आता मोदी तरुणांना म्हणतात भजी तळा. पंतप्रधान मोदींना याचा हिशोब द्यावा लागेल असही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS