मुंबई – मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. भाजपा – शिवसेनेने करून नाही तर भरून दाखवले असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईतील मालाडमध्ये पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून 18 रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटनाही अत्यंत दुर्दैवी असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज सभागृहात मुंबईतल्या अतिवृष्टीमुळे उद्धभवलेल्या घटनांसाठी विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. पाणी तुंबण्याच्या घटनेला महापालिकेला आणि सरकार जबाबदार असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. विरोधकांच्या गदारोळानंतर काही काळ विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.
मुंबईत पावसाने दाणादाण उडवली आहे, अनेक सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. हिंदमाता असेल किंवा दादर टीटीचा परिसर किंवा अंधेरी असेल अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलं आहे. तसंच पाणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात पाणी आलं आहे. त्यांच्या घराबाहेरही पाणी साठलं आहे. नवाब मलिक यांच्या घराच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पाणी साठून उपकरणांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गुडघाभर साठलेल्या पाण्यात उभं राहून आणि घराची अवस्था नेमकी कशी आणि काय झाली ते दाखवणारे फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केले. तसेच करून दाखवलं असं वाक्यही त्यासोबत लिहिलं आहे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
My home @uddhavthackeray @ShivSena @CMOMaharashtra @MCGM_BMC
Karun dakhavla@MumbaiNCP @NCPspeaks #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/372GbptoPQ— Nawab Malik (@nawabmalikncp) July 1, 2019
या जोरदार पावसाचा फटका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलानगर परिसरालाही बसला आहे. वांद्रेतील कलानगरमध्ये तुफान पाणी साचलं आहे. चक्क मातोश्रीचा परिसर जलमय झाल्याने महापालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
COMMENTS