लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या कृती आराखड्यास मंजुरी !

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या कृती आराखड्यास मंजुरी !

मुंबई – औरंगाबाद येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे भव्य स्मारक उभारण्याचे शासनाने निश्चित केले असून, या स्मारकाच्या कृती आराखड्यास सार्वजानिक बांधकाम मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे औरंगाबादमध्ये भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, सदर स्मारक उभारण्याचे काम शहर व औद्योगिक विकास महामंडळ (CIDCO) यांच्या मार्फत करण्यात येणार आहे. सुमारे 12 हजार 932. 581 स्क्वेअर मीटर जागेवर हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

या स्मारकात स्व. गोपीनाथ मुंडे यांचा भव्य पुतळा, त्यांनी वापरलेल्या वस्तू, तसेच पुस्तकांचा संग्रह केला जाणार आहे. या स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर सदर स्मारक औरंगाबाद महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार असून, स्मारकाच्या देखभालीची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या बैठकीला सा.बां. विभागाचे अधिकारी, औरंगाबादचे सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS