मुंबई – सुरुवात तुम्ही केली आहे मात्र याचा शेवट विरोधी पक्ष करणार असल्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. विधिमंडळात दलाली सुरु असलेला आरोप माझ्यावर करण्यात आला असून सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू झाले आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच न्यूज १८ या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. त्यामुळे न्यूज १८ लोकमत वाहिनीवर हेमंत टकले यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते @dhananjay_munde यांच्यावरील कथित आरोपासंदर्भात @News18lokmat चे मालक, संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, वार्ताहर यांच्या विरोधात आ. @hemant_takle यांनी विशेषाधिकार भंग मांडला. सभापतींनी तो स्वीकारला आहे. महिन्याभरात याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
— NCP (@NCPspeaks) March 1, 2018
दरम्यान आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप काढणार असून या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. मी बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच ही लक्षवेधी सूचना २०१६ मधील आहे. जर मी पैसे घेतले असतील तर २०१७मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला असा सवालही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
आज मी जिंकलोय.. सरकार हरलंय,
हजार अग्निपरीक्षा घ्या.. धनंजय मुंडे तयार आहे…
मी कधीच कुणाच्या बापाला घाबरला नाही..
मर्यादा तुम्ही तोडल्या.. आता शेवट मी करणार….#BudgetSession #फसवेसरकार pic.twitter.com/Vu7vI2V7Qp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 1, 2018
मीच जिंकलो
सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलो आहे. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवत आहे ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. एवढ्या क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरच खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते असंही मुंडे म्हणाले आहेत.
COMMENTS