राज्यसभेसाठी भाजपकडून या उमेदवारांना मिळणार संधी ?

राज्यसभेसाठी भाजपकडून या उमेदवारांना मिळणार संधी ?

मुंबई – राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 23 मार्चरोजी निवडणूक पार पडणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं त्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून भाजपकडून कोणकोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबत उत्सुकता लागली होती.  राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये अनेकांची नावं पुढे आली आहेत. संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा सहज निवडून येवू शकतात. त्यामुळं आता या तीन जागांसाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत.

नारायण राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर इतर दोन जागांसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, सहसंघटनमंत्री मुकुल कानिटकर आणि भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे 23 मार्च रोजी पार पडणा-या राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी या उमेदवारांपैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

COMMENTS