मुंडे साहेबांच्या नावाने उघडलेले ऊसतोड कामगारांचे कार्यालय कुठे आहे ? – धनंजय मुंडे

मुंडे साहेबांच्या नावाने उघडलेले ऊसतोड कामगारांचे कार्यालय कुठे आहे ? – धनंजय मुंडे

मुंबई – बस्स झाले भावनेचे राजकारण, सामान्य माणूस उद्ध्वस्त झाला आहे. त्या सामान्य माणसाचा संताप आगामी निवडणुकीच्या मतदानातून व्यक्त होणार असल्याचा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला आहे. धारूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी भाजपच्या कारभारावर आसूड ओढले आहेत. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असतांना कुठे आहे मुंडे साहेबांच्या नावाने उघडलेले ऊस तोड कामगारांचे कार्यालय? कुठे आहे रेल्वे? बीड जिल्हा विकास शोधतोय असा टोलाही यावेळी धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

दरम्यान महागाई वाढली म्हणून ओरडणाऱ्या भाजप सरकारने महागाईचा कळस गाठला असून सर्वसामान्य माणसाची लूट या सरकाने केली असल्याचा आरोपही मुंडे यांनी यावेली केला आहे. शेतकरी वर्ग दिवसोंदिवस रसातळाला जात जात असून अच्छे दिन कुठं आहेत? कुठं आहे युवकांना रोजगार? कुठे आहे काळे धन? कुठे आहे पंधरा लाखांचं फक्त स्वप्न? असा सवालही मुंडे यांनी केला आहे. तसेच आगामी निवडणुकीत  सर्वसामान्य माणूस, युवक वर्ग या भाजप सरकारची वाट लावल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

 

COMMENTS