मुंबई – टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. उपसमितीची पहिली बैठक उद्या शनिवार दि. २ मार्च २०१९ रोजी होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील – निलंगेकर या सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS