पक्षबदलासंदर्भात  दिलीप सोपल यांचा उद्या अंतिम निर्णय !

पक्षबदलासंदर्भात  दिलीप सोपल यांचा उद्या अंतिम निर्णय !

बार्शी – राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या पक्षबदलाबाबत उद्या निर्णय होणार आहे. दिलीप सोपल यांनी आज आणि उद्या मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता ग्रामिण भागातील कार्यकर्त्यांची सोपल यांच्यासोबत बैठक होणार आहे. तर उद्या बार्शी शहरातील कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन दिलीप सोपल हे पुढील राजकीय भूमिका ठरवणार आहेत. सोपल शिवसेनेत प्रवेश करणार की राष्ट्रवादीतच राहणार याचा फैसला उद्या होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिलीप सोपल हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी अत्यंत घनिष्ट संबंध असलेले दिलीप सोपल राष्ट्रवादी सोडणार का याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र अनेक कार्यकर्त्यांनी सत्तेसोबत जावे अशी भूमिका घेत शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी आग्रह धरल्याचं बोलंल जातंय. तर काही कार्यकर्ते मात्र राष्ट्रवादी सोडू नये अशी भूमिका घेत आहेत अशी चर्चा आहे.

युतीमध्ये बार्शीची जागा शिवसेनेकडे आहे. 2014 मध्ये माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवेसनेकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा परभाव झाला होता. त्यानंतर राऊत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राऊत यांच्यासाठी भाजप ही जागा घेईल अशी चर्चा होती. मात्र आता विद्यमान आमदार असलेल्या दिलीप सोपल यांनी शिवसनेत प्रवेश केल्यास ही जागा शिवसेना सोडणार नाही. मग राजेंद्र राऊत काय करणार ?  अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार की राष्ट्रवादी काग्रेसमध्ये प्रवेश करणार याबाबत विविध चर्चा सुरू आहेत.

COMMENTS