… तर मकरंद निंबाळकर  किंवा “हे” असणार राष्ट्रवादीचे उमेदवार ?

… तर मकरंद निंबाळकर  किंवा “हे” असणार राष्ट्रवादीचे उमेदवार ?

सध्या राज्याच्या राजकारणात पक्षांतराची मोठी लाट आहे. कधी कोण कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नाही. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील समिकरणे अगदी उलटी सुलटी होत आहेत. बार्शी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे दिलीप सोपल हे शिवसेनच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांनी आज आणि उद्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. आज ग्रामिण भागातील तर उद्या शहरातील कार्यकर्त्यांशी सोपल बोलणार आहेत. त्यानंतर उद्या ते पक्षबदलाबाबतचा निर्णय जाहीर करणार आहेत.

जर दिलीप सोपल शिवसेनेत गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसचा बार्शीतून उमेदवार कोण असा प्रश्न आहे. दिलीप सोपल यांचे कट्टर राजकीय विरोधक राजेंद्र राऊत हे सध्या भाजपमध्ये आहेत. युती झाली तर राजेंद्र राऊत काय करणार असा प्रश्न आहे ?  राऊत अपक्ष म्हणून लढणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार याबाबत अजून अनिश्चितता आहे. पण राऊत हे अपक्षच रिंगणात राहतील अशी चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रासला इतर उमेदावर शोधण्याशिवाय पर्याय नाही.

बार्शी विधानसभा मतदारसंघात वैराग भागातील जवळपास 57 गावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथले नेते मकरंद निंबाळकर यांचे या 57 गावांवर चांगले वर्चस्व आहे. त्यामुळे मकरंद निंबाळकर हे राष्ट्रवादीचे बार्शीचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे. अजित पवार यांनी सोलापूरला घेतलेली मुलाखतही निंबाळकर यांनी दिली होती. त्याचसोबत माजी आमदार राजन पाटील यांच्या नावाचीही बार्शी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून चर्चा आहे. दिलीप सोपल शिवसनेते जातात की राष्ट्रवादीतच राहतात याचा निर्णय उद्या होईल. त्यानंतरच याबाबत निश्चित अशी समिकरणे पुढे येतील.

COMMENTS