मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप साेपल यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर सोपल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्य बँक गैरव्यवहारात माझंही नाव आहे. परंतु हायकाेर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच माझा प्रवेश निश्चित झाला हाेता. मी काही केलंच नसल्यानं मी सुरक्षित असल्याचं सोपल यांनी म्हटलं आहे. तसेच २३ वर्षांनी घरी परतलाेय. कुणावर रागावून किंवा माझ्यावर अन्याय झाला म्हणून शिवसेनेत आलाे आहे असं नाही. कार्यकर्त्यांचा आग्रह हाेता म्हणून शिवसेनेत आलाे असल्याचं सोपल यांनी म्हटलं आहे. तसेच पक्ष अडचणीत असताना प्रवेश का केला. यावर बोलताना २००९ आणि १९८५ मध्ये असं पक्षाने दाेनदा तिकीट कापलं हाेतं, तेव्हा मी अपक्ष उभा राहिलाे हाेताे असं सोपल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सोपल यांच्या प्रवेशानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिलीपराव हे जुने सहकारी आहेत, तेव्हा आमचे सहयाेगी सदस्य हाेते. मधल्या काळात थाेडं इकडं तिकडं झालं हाेतं. परत आपल्या घरात ते आले आहेत त्यामुळे त्यांचे शिवसेनेत स्वागत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. भुजबळांच्या पक्षप्रवेशावर बोलताना जे काही हाेईल ते सर्वांच्या समाेर हाेईल, लपूनछपून काही हाेणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS