साखरेची आयात पूर्णपणे बंद करुन निर्यातीसाठी अनुदान द्या -दिलीप वळसे-पाटील

साखरेची आयात पूर्णपणे बंद करुन निर्यातीसाठी अनुदान द्या -दिलीप वळसे-पाटील

दिल्ली – राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या शिष्टमंडळाने केंद्र सरकारचे साखर सहसचिव सुभाषित पांडा यांची भेट घेतली आहे. साखर महासंघ अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, व्सवस्थापकीय महासंचालक प्रकाश नाईकनवरे यावेळी उपस्थित होते. देशाबाहेर साखर पाठविण्यासाठी अनुदान द्यावे आणि आयात पूर्णपणे बंद करण्याची मागणी साखर कारखाना महासंघाने यावेळी केली आहे.

 

दरम्यान सरकारनं इम्पोर्ट ड्यूटी पाठवून एक्सपोर्ट ड्यूटी बंद करावी यासाठी शेतक-यांची मदत करण्याची मागणी वळसे-पाटील यांनी त्यावेळी केली आहे. तसेच यावर्षी उत्पादनात वाढ झाली असून २६० लाख टन साखर जास्त वाढली आहे. त्यामुळे साखरेच्या किंमती खाली येत असून साखरेचे भाव २९०० पर्यंत खाली आले आहेत. त्यामुळे एफआरपी किंमत २५०० रूपये देण्याची ठरली तरी प्रोडक्शन कॉस्ट जास्त जाते. क्विंटलमागे ७०० रूपये नुकसान होते, शॉर्ट मार्जिनमुळे उसाची किंमत वेळेत देता येणार नाही, त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो असही वळसे पाटील यांनी त्यावेळी म्हटलं आहे. केंद्र सरकारने वेळीच मदत केली नसल्यामुळे कारखाने अडचणीत आले असून बॅंकांनी नवीन कर्ज दिले नाही तर सिजन अडचणीत येईल असे संकेत त्यावेळी या शिष्टमंळाने दिले आहेत.

COMMENTS