महाराष्ट्र दिनी एसटीकडून शहीद जवानांच्या  वीर पत्नींचा सन्मान !‍

महाराष्ट्र दिनी एसटीकडून शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान !‍

मुंबई – राष्ट्राच्या संरक्षणासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नींना एस.टी. महामंडळातर्फे “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान” योजने अंतर्गत एस.टी. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवासाची सवलत व त्यांच्या एका पाल्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार एस.टी. महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे. अशी माहिती मा.परिवहन, खारभूमी विकास मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी दिली. या योजनेचा शुभारंभ सन्माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते 1 मे, 2018 रोजी  (महाराष्ट्र दिन) मोफत प्रवासाचे स्मार्ट कार्ड प्राथमिक स्वरुपात 5 वीर पत्नींना देऊन (शिवाजी पार्क, मुंबई) होणार आहे. शिवतीर्थावर होणाऱ्या या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी बोलताना, श्री. रावते म्हणाले की, देशासाठी प्राणाची अहुती दिलेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सन्मान करण्याच्या हेतूने “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान” योजना कार्यान्वीत होत असून, या माध्यमातून शहीदांना श्रध्दांजली अर्पीत करण्याचे राष्ट्रीय कार्य एस.टी. महामंडळकडून होत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमाबरोबरच सर्व जिल्हयात सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते याच दिवशी त्या भागातील वीर पत्नींना या योजनेअंतर्गत स्मार्ट कार्ड प्रदान करण्यात येणार आहे.

COMMENTS