जनताच आता भाजप-सेना सरकारला अपात्र ठरविणार – विखे-पाटील

जनताच आता भाजप-सेना सरकारला अपात्र ठरविणार – विखे-पाटील

यवतमाळ – यवतमाळमधील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांची भेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज घेतली आहे. सावळेश्वर व राजूरवाडी गावाला भेटे देऊन त्यांनी माधव रावते व शंकर चायरे यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाखाची मदत केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री असंवेदनशील असल्याची जोरदार टीका यावेळी त्यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरी प्रश्नांपुढे पळ काढणारे असून शेतकरी आत्महत्या अपात्र ठरवून दडपण्याचा प्रकार सुरू  असल्याचीही टीका यावेळी त्यांनी केली आहे. तसेच जनताच आता भाजप-सेना सरकारला अपात्र ठरविणार असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मूठभर धनिकांचं भलं करण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे. तसेच हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नेम चेंजर असून सरकारची मानसिकता इव्हेंट मॅनेजमेंट करण्याची आहे. तसेच महाराष्ट्र हा गुन्हेगारांचा अड्डा करुन ठेवला असल्याचा घणाघातही यावेळी विखे-पाटील यांनी केला आहे.

COMMENTS