मुंबई– अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी पाकिस्तानवर चांगलेच भडकेल असल्याचं पहावयास मिळालं आहे. अमेरिका पाकिस्तानला गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक मदत करत आहेत परंतु पाकिस्तानकडून आम्हाला काय मिळालं असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आजपर्यंत कपट, तिरस्कार आणि दहशतवादापलीकडे पाककडून काही मिळालं नाही त्यामुळे यापुढे पाकिस्तानला आर्थिक मदत तर सोडा फुटकी कौडीही देणार नसल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. ट्र्म्प यांनी केलेल्या ट्वीटमुळे अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध चांगलेच दुरावले असल्याचं दिसून येत आहे.
The United States has foolishly given Pakistan more than 33 billion dollars in aid over the last 15 years, and they have given us nothing but lies & deceit, thinking of our leaders as fools. They give safe haven to the terrorists we hunt in Afghanistan, with little help. No more!
— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 1, 2018
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या जाहीर टीकेमुळे आंतरराष्ट्रीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. तसेच अमेरिकेकडून येत्या काही दिवसांत पाकिस्तानला तब्बल २५ हजार ५०० कोटी डॉलर्सची मदत देण्यात येणार होती. परंतु ती आता देणार नसल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. यापूर्वीही अमेरिकेने २०१२ पासून पाकिस्तानला तब्बल ३३०० कोटी डॉलर्सची मदत केली आहे. परंतु त्याबादल्यात पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देण्याच काम केलं आहे. असंही ट्रम्प यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्रम्प यांनी केलेल्या या ट्विटमुळे पाकिस्तानचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
COMMENTS