मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा जोर का झटका, पुन्हा मिळवली एकहाती सत्ता !

मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा जोर का झटका, पुन्हा मिळवली एकहाती सत्ता !

उस्मानाबाद – मजूर फेडरेशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे. सर्वपक्षीय पॅनलला धोबीपछाड करत राष्ट्रवादीनं एकूण १३ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे उस्मानाबाद मजूर फेडरेशनची निवडणूक राष्ट्रवादीने जिंकत पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. या निवडणुकीत १३ पैकी २ जागा बिनविरोध काढत राष्ट्रवादीने खाते उघडले होते. परंतु उर्वरीत ११ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले.  यातही राष्ट्रवादीनं पैकीच्या पैकी जागा जिंकल्या आहेत. या निडणुकीसाठी सर्वपक्षीयांनी तगडी फिल्डींग लावत निवडणूक चुरशीची केली होती. परंतु राष्ट्रवादीने पुन्हा एकदा एकहाती सत्ता कायम ठेवत विरोधकांना धोबीपछाड केलं आहे. त्यामुळे निकाल लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला असल्याचं पहावयास मिळालं आहे.

 

COMMENTS