मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मित्रपक्षांबाबत नमती भूमिका घेतल्याचं दिसतआहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपा वाटाघाटी करताना मित्रपक्ष दुखावले जाऊ नयेत यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच राज्यात सत्तेत असून सतत विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेला दुखावलं जाऊ नये असा आदेशच भाजपा नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी दिला आहे.जागा वाटपाची बोलणी होईपर्यंत शिवसेनेविरोधात बोलू नये असं भाजपा पक्षश्रेष्ठींनी नेत्यांना म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेनेने आपल्यावर कोणतीही टीका केली तरी त्यांना प्रत्युत्तर देताना किंवा कोणतीही टीका करताना संयम बाळगा असं नेत्यांना बजावण्यात आलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेहमी आक्रमक पवित्रा घेणारे भाजपा नेते सध्या एक पाऊल मागे जाताना दिसत आहेत. भाजपच्या या नमत्या भूमिकेमुळे शिवसेना युती करणार का हे पाहणं गरजेचं अहे.
COMMENTS