‘या’ आठ आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित होण्याची शक्यता !

‘या’ आठ आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित होण्याची शक्यता !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजप काँग्रेसला मोठा धक्का देणार असल्याचं दिसत आहे. कारण काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे नाराज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिली आहे. पक्षाने माझी कोंडी केली आहे. काँग्रेसमध्ये माझी घुसमट होत आहे. आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. त्यामुळे विखे यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे दहा ते बारा आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी यापूर्वीच फारकत घेतली असून कालिदास कोळंबकर भाजपाच्या संपर्कात आहेत. तसेच विखे यांच्याबरोबर अब्दुल सत्तार, जयकुमार गोरे, भारत भालके, गोपाळ अग्रवाल, सुनील केदार, भारत भालके, चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे,आमदार गोपाळ अग्रवाल, सुनील केदार यांनीही विखेंची भेट घेतल्याने तेही भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.त्यामुळे या आमदारांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर हा काँग्रेसला मोठा धक्का असणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS