पुणे – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसत़ आहे. कारण भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधातील अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी दाखल केलेला त्रयस्थ अर्जदाराचा हस्तक्षेप अर्ज पुणे सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 9 जानेवारीला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांना क्लीनचिट दिल्यानंतर, दमानिया यांनी सर्वोच्च न्यायालयातील निकालाचा दाखला देत त्याला आव्हान दिलं होतं. यामध्ये त्यांनी खडसेंनी पदाचा गैरवापर करत जमीन पत्नी आणि जावयाच्या नावे विकत घेतल्याचा आरोप केला आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार एका दिवसात झाला असून, याबाबतचे पुरावे दिल्याचं वकिलांनी न्यायालयात म्हटलं आहे. त्यामुळे
9 जानेवारीच्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS