जळगाव – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदं मिळाली, मात्र मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहिले म्हणून कोणताही गुन्हा नसताना आपली ही अवस्था झाली असल्याचं वक्तव्य खडसे यांनी केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ‘पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं’ अशी इच्छा एका मुस्लिम कार्यकर्त्याने व्यक्त केली. यावर उत्तर देताना, मंत्रिपदाचं काय, येतात आणि जात असतात. 40 वर्षांच्या काळात आपण अनेक मंत्रिपद भूषवली, तसेच य मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS